मेहकर : शहरातील शासनमान्य शाळेतील शिक्षक अवैध शिकवणीवर्ग व अतिरिक्त तासिका घेत असून, असे शिकवणीवर्ग घेणा:या शिक्षकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनने गटशिक्षणाधिकारी मेहकर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मेहकर शहरातील शासनमान्य शाळेवरील शिक्षक आपल्या विभागाची बंदी असताना राजरोसपणे शिकवणी वर्ग घेत आहेत. तसेच काही शाळाही अतिरिक्त तासिकेच्या नावावर विद्याथ्र्यांची फसवणूक करीत आहे. अतिरिक्त तासिका घेण्यासाठी संबंधीत शाळांनी शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असतांना कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अतिरिक्त तासिकेच्या नावावर अवैध शिकवणी वर्ग सुरु आहेत. शाळेत कार्यरत असतांना शिक्षक, प्राध्यापक मंडळी शहराच्या विविध भागात अवैध शिकवणी वर्ग घेत आहेत. या माध्यमातून अनेक शिक्षक विद्याथ्र्यांची अडवणूक करून करीत असतात. vidarbhadoot
No comments:
Post a Comment