Search This Blog

Tuesday 23 July 2013

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, sanjay nikas

स्वप्रांची सुंदर पहाट श्रावणातली. मनाला नवी उर्मी देणारी आणि उमेद देणारी. नव्याचैतन्याने जगण्याचे बळ देणारी. शंकरमहादेवाचा खास महिना. आणि बाळगोपाळांचा दर सोमवारी अर्धा दिवस शाळेचा महिना. या खास पर्वावर माझ्या सर्व मित्रांना बालकवींची कविता वाचायला देत आहे. लिखाणात थोडीफार चूक होऊ शकते पण भावार्थ समजून घ्या. आपला मित्र- संजय निकस पाटील 


श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरती बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

- बालकवी

No comments:

Post a Comment