Search This Blog

Friday 19 July 2013

vidarbhadoot 'महाबीजमुळे वाशिम जिल्ह्यात सोयाबीन बिजोत्पादन दुप्पट vidarbhadoot


अकोला - वाशिम जिल्ह्यात यंदा सोयाबीन बिजोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) घेतलेल्या खास मेहनतीमुळे दुप्पट वाढ झाली आहे. १० हजारांपेक्षाही जास्त हेक्टरमध्ये यावर्षी बिजोत्पादन कार्यक्रम राबविल्या जात आहे. ही जिल्ह्यातील शेतक:यांसाठी मोठी उपलब्धी आहे. यात वाशिमचे जिल्हाधिकारी आर.जी.कुळकर्णी यांचे मोठे योगदान आहे.
वाशिम जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून महाबीजच्या सहकार्याने सोयाबीनचा पेरा वाढताच आहे. यात  २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राहून अधिक क्षेत्रात यंदा सोयाबीनचा पेरा झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कमी-अधिक प्रमाणात सोयाबीनचा पेरा होत असला तरी वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्यात अर्थात सध्याच्या वाशिम उपविभागात सोयाबीनचा पेरा जिल्हय़ातील एकूण पे:यांच्या ६० टक्केहून अधिक आहे. जिल्ह्यात उत्पादित होणा:या सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती ८७ टक्के एवढी आहे.
जिल्ह्यात गतवर्षी ५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचे बीजोत्पादन झाले होते. राज्यात सेयाबीनच्या बियाण्याचे पासिंग करण्यासाठी किमान उगवणशक्ती ७० टक्के एवढी आवश्यक धरली जाते. ही बाब लक्षात आल्याने जिल्हाधिकारी आर.जी.कुळकर्णी यांनी वाशिमचे उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर यांच्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे बीजोत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार अमानकर यांनी जिल्हाधिका:यांच्या मार्गदर्शनात मे महिन्यात महाबीजचे अधिकारी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, जिल्ह्यातील अनेक शेतकरी, तालुका कृषी अधिका:यांची बैठक बोलावली. त्या बैठकीत महाबीजसह इतरही उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादनवाढीसाठी सोयाबीन बियाणे निर्मितीचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच बियाण्यांवर प्रक्रिया करण्यासाठी सांगण्यात आले. शेतक:यांना सोयाबीन बियाणे उत्पादन करण्यासाठी प्लॅाट घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात महाबीजने कास्तकारांना योग्य मार्गदर्शन करीत सोयाबीन बिजोत्पादनासाठी नियोजनबद्ध सोयी उपलब्द करून दिल्या. आणि त्याचाच फायदा होत आज जिल्ह्यात सर्वाधिक बिजोत्पादन महाबीजच्या सहकार्याने शेतकरी घेत आहेत. यामुळे दहा हजार हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रात सोयाबीन बियाण्याची लागवड केली असल्याने या क्षेत्रातून दीड ते दोन  लाख क्विंटल बियाण्यांचे उत्पादन होणार आहे. पुढील वर्षी सोयाबीन बियाणे उत्पादनाच्या क्षेत्रात २० हजारापेक्षा जास्त हेक्टरएवढी वाढ करण्याचा मानस जिल्हाधिकारी कुळकर्णीयांनी व्यक्त केला आहे. vidarbhadoot 9405665599

No comments:

Post a Comment