Search This Blog

Friday 19 July 2013

vidarbhadoot अवघ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरीचा सावळा विठ्ठल

vidarbhadoot
शेतीत राब-राब राबणार इथला शेतकरी-वारकरी  जेवढ्या निष्ठेने शेती करीत असतो, अगदी त्याच निष्ठेने आषाडी एकादशी आली म्हणजे त्याचे पाय पंढरीची वाट चालायला लागतात. सावळ्या विठ्ठलाचे ते सुंदर रुपडे मनाच्या गाभा:यात साठवून घेण्याची ओढ असते. तिथे कोणतेही मागणे नसते, की कोणताही स्वार्थ नसतो. अवघ्या वारकरी सांप्रदायाच्या दैवताला भेटण्याची फक्त ओढ असते. आणि अशाच प्रकारे अवघा महाराष्ट्र पंढरीत एकवटत असतो. आणि सावळा विठ्ठलही आपल्या भक्तांसाठी तेथे हतर असतो. केवळ एका भक्तामुळे विठ्ठल पंढरीत स्थिरावला आहे. भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढपूर हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले. भागवत धर्माची पताका पंढपुरीच्या विठ्ठलाखातर अनेक वर्षे दिमाखात फडकत आहे. महाराष्ट्रातील भोळ्या भा़बड्या जीवांवर या पंढरीच्या विठूने जनूकाही आपले मायाजाल फेकले आहे. त्याच्यासाठी लांबून लांबून लोक दरवर्षी चालत येतात. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे. येथून विठ्ठलमंदिर जवळच आहे. मंदिर पूर्वाभिमूख असून त्यास तटबंदी आहे. त्याला एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पाय-या आहेत. त्यांतील पहिली पायरी नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. संत चोखामेळा यांची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोप:यात आहे. आत जाताच छोटा मुक्तीमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. जवळच्याच दालनांत काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दुसरा खांब सोन्या-चांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्व गरुडस्तंभ होता असे सांगतात. पुढे चौखांबी मंडप आहे. उत्तरेस देवाचे शेजघऱ आहे. नंतरची चौरस जागा ' कमानÓ नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मीटरपेक्षा किंचित जास्त आहे. असा हा विठ्ठलाचा तेथील देखणा साज आहे. आणि संपूर्ण वारकरी सांप्रदायाचा याच विठ्ठलाला भेटण्याचा आटापीटा राहतो. चला तर मग आपणही जाऊया सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला!!!  sanjay nikas 9405665599

No comments:

Post a Comment