Search This Blog

Saturday 13 June 2020

उपचारासाठी औषधांपेक्षाही चहा प्रभावी Vidarbhadooot

शिमला- कोरोना व्हायरसविरोधात आतापर्यंत ना कोणती लस ना कोणते औषध. इतर आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांचे ट्रायल कोरोनाविरोधात केले जात आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एचआयव्हीची औषध कोरोनावर उपचारासाठी प्रभावी ठरू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. मात्र एचआयव्ही औषधांपेक्षाही कांगडा चहा कोरोनावर प्रभावी ठरू शकते, असा दावा हिमाचल प्रदेशातील तज्ज्ञांनी केला आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशच्या पालमपूरमधील इन्स्टिट्युट ऑफ हिमालया बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीचे डॉ. संजय कुमार यांनी कांगडा चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, असे म्हटले. आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त आयोजित वेबिनारदरम्यान संजय कुमार असे म्हणालेत. डॉ. संजय कुमार यांनी सांगितले, चहामध्ये असे रसायन असतात जे कोरोनाव्हायरसवर नियंत्रणासाठी एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक प्रभावी असू शकतात. आमच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर आधारित मॉडेलचा वापर करून जैविक रूपाने सक्रिय ६५ रसायन किंवा पॉलिफेनॉल्सचे परीक्षण केले. जे विशिष्ट व्हायरल प्रोटिनला एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत अधिक कुशलेतेने जखडून ठेवू शकतात. मानवी पेशींत व्हायरसला प्रवेश करण्यात मदत करणार्‍या व्हायरल प्रोटिनला हे रसायन निष्क्रिय करू शकतात. चहा आधारित नैसर्गिक सुगंधित तेलयुक्त अल्कोहोल सॅनिटायझरचे उत्पादनही करत आहेत. तसेच चहाच्या अर्काचा वापर करून हर्बल साबणही तयार केले जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या साबणात अँटिबॅक्टेरिअल, अँटिव्हायरल गुण आहेत. हिमाचलातील दोन कंपन्यांमार्फत या साबणाचे उत्पादन आणि विपणन केले जात आहे. अमेरिकेतील थिंक टँक मिल्कन इन्स्टिट्युटच्या ट्रॅकरनुसार कोरोनाव्हायसवर उपचारासाठी १३0 पेक्षा जास्त औषधांचे परीक्षण सुरू आहे. काही औषधांमध्ये व्हायरसला रोखण्याची क्षमता असू शकते. तर काही औषधं रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होण्यापासून रोखू शकतात. सीएसआयआरचे राम विश्‍वकर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

    

No comments:

Post a Comment