Search This Blog

Saturday 13 June 2020

कोरोनापासून संरक्षणासाठी आर्सेनिक अल्बम ३0 होमिओपॅथी औषध?

 मुंबई-कोरोनाव्हायरसविरोधात कोणती लस नाही किंवा कोणतं प्रभावी औषध नाही. वेगवेगळ्या औषधांचे ट्रायल कोरोनाविरोधात केले जात आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिवीर अशा काही औषधांनंतर सध्या आर्सेनिक अल्बम ३0 या होमिओपॅथी औषधाची सर्वत्र चर्चा आहे. नेमकं हे औषध नेमकं काय आहे? आणि ते कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी ठरू शकतं का? हे जाणून घेऊ यात.
आर्सेनिक अल्बम ३0 हे औषध घेण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानेच दिला आहे. सलग ३ दिवस रिकाम्या पोटी या औषधाचा एक डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका महिन्यानं पुन्हा असाच डोस घ्यावा असंही सांगण्यात आलं आहे.
आयुष मंत्रालयाने प्रतिबंधात्मक म्हणून हे औषध घेण्याचा सल्ला दिल्यानंतर या औषधाकडे लोकांचा कल वाढू लागला. कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीतही कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबाला या औषधांचं वाटप करण्यात आले, शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील या औषधाचे वाटप सुरू केले. मात्र हेच औषध सध्या सर्वत्र का दिले जाते आहे?
नवी मुंबईतील होमिओपॅथी डॉक्टर तुषार बोरकर यांनी सांगितलं, होमिओपॅथीचं एक औषध बर्‍याच आजारांवर काम करू शकतं. सध्या आर्सेनिक अल्बम ३0 हे औषध चर्चेत आहे, कारण कोविड- १९ ची लक्षणं आहेत, त्या लक्षणांवर प्रभावी असणारे हे औषध आहे. ही लक्षणे असलेले बहुतेक रुग्ण या औषधाला चांगली प्रतिक्रिया देत आहेत, असे दिसून आले आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आयुष मंत्रालयानेही हे औषध घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे लहानांपासून मोठय़ांपयर्ंत सर्वजण हे औषध घेऊ शकता. फक्त प्रतिबंधात्मक म्हणूनच नव्हे तर उपचार म्हणूनही हे औषध वापरता येऊ शकते. Vidarbhadoot Buldhana

No comments:

Post a Comment