Search This Blog

Saturday 13 June 2020

घरी पाहुण्यांना बोलावले, तर बसेल दंड!

कोल्हापूर -कोरोना व्हायरसची भीती आता सर्वच लोकांमध्ये पसरली आहे. खेड्यापाड्यांमध्ये त्याबाबत जनजागृती झाली आहे. शहरात पोलिस आणि प्रशासन नागरिकांना सतर्क करत आहे. तर खेड्यांमध्ये ग्रामपंचायत आणि नागरीक मिळून उपाय योजना करत आहेत. कोल्हापूर जिलतल्या म्हसवे ग्रामपंचायतीने तर एक खास नोटीस काढून लोकांना सावध केले आहे. ग्रामदेवतेच्या पुजेसाठी कुणीही जमू नका किंवा पाहुण्यालाही बोलावू नका अशी नोटीस काढलीय. ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
ग्रामदेवतेची पूजा असल्याने ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून ही नोटीस काढली आहे. तर अशी आहे म्हसवे ग्रामपंचायतीची ही नोटीस पुढीलप्रमाणे आहे. सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की, आपल्या म्हसवे गावाची मिरगी म्हाई करण्यात येणार आहे. म्हाई ही घरातल्या घरात करावी. कोणीही बाहेर गावातील पाहुणे बोलाऊ नये. कोणीही देवळात नैवेद्य दाखवायला जाऊ नये. सर्वांनी घरातुनच नैवेद्य दाखवावा. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नैवेद्य दाखवायला आल्यास ३00 रुपये, घरी एक पाव्हणा दिसल्यास ३00 रुपये, घरी दोन पाव्हणे दिसल्यास ६00 रुपये, दोनपेक्षा जास्त पाव्हणे दिसल्यास एक हजार रुपये असे दंड आकारण्यात येतील. याची सर्व ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी. वरील कामाची अंमलबजावणी करण्यासाठी कोरोना स्वयंसेवक कमिटीतील ६0 स्वयंसेवक कार्यरत असतील. यापैकी अंबाबाई देवालयात पाचजण, मरगुबाई देवालयात पाच जण असतील. तर ५0 स्वयंसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिसपाटील, ग्रामसेवक, सरपंच , तलाठी व कोतवाल, हे गावात येणार्‍या पाहुण्यांच्याकडुन सक्तीने दंड वसूल करतील. कोरोना दक्षता समिती व ग्रामपंचायत म्हसवे यांच्यातर्फे ही नोटीस काढण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment