Search This Blog

Sunday 1 September 2013

shivaji mhaske प्रा. शिवाजी म्हस्के यांना 'शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

shivaji mhaske
जानेफळ- सामाजिक वनीकरणाच्या वनेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रा. शिवाजी म्हस्के यांना  'श्री. शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०११Ó जाहीर झाला आहे. राज्य सरकारकडून सदर पुरस्कार देण्यात येत असतो. प्रा. म्हस्के हे स्थानिक श्री. सरस्वती क. महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
राष्ट्रीय वननिधी नुसार राज्यातील ३३ टक्के क्षेत्र वनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच २०  कलमी कार्यक्रमातंर्गत व अन्य वृक्ष लागवडीच्या पुरक योजना मार्फत जास्तीत जास्त पडिक जमीनीवर वृक्षरोपण वाढविण्यासाठी व पर्यावरण संतुलनासाठी काम करणा:या व्यक्ती-संस्था यांना प्रोत्साहन देणे व जनजागृती निर्माण करणे. सोबतच त्यांनी केलेल्या भरीव कार्याची एकप्रकारे पावतीच हा पुरस्कार आहे. प्रा. म्हस्के यांना व्यक्ती या संवर्गात सदर पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. म्हस्के यांनी २००२ या वर्षी महाविद्यालयात राष्ट्रीय हरीत सेनेची स्थापना केली आहे. हरीत सेनेमार्फत त्यांनी परिसरात व पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व संवंर्धन केले. येथूनच त्यांनी वृक्षलागवडीसाठी परिसरातील लोकांना प्रेरित करून त्यांना रोपांचे मोफत वितरण केले. सदर पुरस्कार महसूल स्तरावर व्यक्ती, ग्राम पंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम व जिल्हा यासाठी प्रथम पुरस्कार ५० हजार रुपये, व्दितीय पुरस्कार ३० हजार रुपये.  राज्यस्तरावर संवर्गनिहाय व्यक्ती, ग्राम पंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम व जिल्हा यासाठी प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, व्दितीय पुरस्कार ७५ हजार व तृतीय पुरस्कार ५० हजार रुपये देण्यात येत असतो. सदर पुरस्काराची रक्कम राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र या स्वरुपात देण्यात येईल, असा अलिकडेच या पुरस्काराच्या स्वरुपात बदल झाला आहे. प्रा. म्हस्के यांना सदर पुरस्कार जाहीर झाल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment