Search This Blog

Wednesday 11 September 2013

संधी रोजगाराची खात्री नोकरीची

संधी रोजगाराची खात्री नोकरीचीगुरुवार, ०५ सप्टेंबर, २०१३
उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्‍या महाऑपमध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!

पुणे विभागीय माहिती कार्यालयात 12 जागा
पुणे विभागीय माहिती कार्यालयात व त्यांच्या अधिनस्त जिल्हा कार्यालयात लिपिक संवर्ग (6 जागा), सिनेयंत्र चालक (2 जागा), वाहन चालक (1 जागा), शिपाई/संदेशवाहक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची माहिती www.maharashtra.gov.in व www.dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या 111 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासकीय शाखामधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे (111 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये 6 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

रायगड जिल्हा परिषदेत 115 जागा

रायगड जिल्हा निवड समितीद्वारे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (1 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास योजना (5 जागा), औषध निर्माता (9 जागा), आरोग्य सेवक-महिला (18 जागा), पशुधन पर्यवेक्षक (4 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (16 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (5 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (7 जागा), परिचर (39 जागा), स्त्री परिचर (11 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 9 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.raigad.gov.in व www.zpraigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकिय अधिकारीच्या 12 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात वैद्यकिय अधिकारी-प्रसुतीगृह (12 जागा) हे पद तदर्थ तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती प्रक्रिया दि. 20 सप्टेंबर 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकमत व सामनामध्ये दि. 5 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत 4 जागा
पुण्यातील सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी-वैद्यकीय अधिकारी (1 जागा), वरिष्ठ तांत्रिक अधिकारी- वैद्यकिय अधिकारी (1 जागा), तांत्रिक अधिकारी (1 जागा), तांत्रिक सहायक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://jobs.ncl.res.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जलसंपदा विभागाच्या नाशिक परिमंडळातील कार्यालयात 24 जागा 
नाशिक जिल्हा निवड समिती मार्फत जलसंपदा विभागाच्या नाशिक परिमंडळातील कार्यालयात शिपाई (12 जागा), चौकीदार (4 जागा), कालवा चौकीदार (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 4 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/wrdclass4 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जलसंपदा विभागाच्या मुंबई परिमंडळातील कार्यालयात 92 जागा 

जलसंपदा विभागाच्या कोंकण प्रदेशांतर्गत मुंबई परिमंडळातील कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (34 जागा), आरेखक (1 जागा), सहाय्यक आरेखक (1 जागा), अनुरेखक (6 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (5 जागा), भांडारपाल (2 जागा), सहाय्यक भांडारपाल (1 जागा), लघुलेखक निम्नश्रेणी (1 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), वरिष्ठ लिपिक (10 जागा), लिपिक टंकलेखक (24 जागा), वाहनचालक (5 जागा), दप्तर कारकून (1 जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.wrdthane.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जलसंपदा विभागाच्या मुंबई परिमंडळातील ठाणे कार्यालयात 13 जागा 

जलसंपदा विभागाच्या कोंकण प्रदेशांतर्गत मुंबई परिमंडळातील ठाणे कार्यालयात शिपाई (5 जागा), चौकीदार (3 जागा), प्रयोगशाळा परिचर (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. अधिक माहिती  www.ticgroupd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जलसंपदा विभागाच्या नागपूर परिमंडळातील कार्यालयात 306 जागा 
जलसंपदा विभागाच्या नागपूर प्रदेशांतर्गत विविध कार्यालयात वरिष्ठ लिपिक (20 जागा), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक/संगणक (36 जागा), सहाय्यक भांडारपाल (2 जागा), अनुरेखक (16 जागा), लघुलेखक उच्चश्रेणी (1 जागा), लघुलेखक निम्नश्रेणी (1 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (3 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (74 जागा), कालवे निरीक्षक (20 जागा), मोजणीदार (9 जागा), दप्तर कारकून (21 जागा), वाहनचालक (28 जागा), शिपाई (55 जागा), चौकीदार (15 जागा), प्रयोगशाळा परिचर (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. अधिक माहिती  www.wrdngp.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा या कार्यालयात 21 जागा

मुंबईतील नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा या कार्यालयात शिपाई (16 जागा), पहारेकरी (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 31 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.


जलसंपदा विभागात रायगड जिल्ह्यात 10 जागा 

जलसंपदा विभागाच्या कोंकण प्रदेशांतर्गत मुंबई परिमंडळातील रायगड जिल्ह्यातील शिपाई (4 जागा), चौकीदार (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. अधिक माहिती  www.nkipcgroupd.com व https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा निवड समितीमार्फत जलसंपदा विभागात 10 जागा

सिंधुदुर्ग जिल्हा निवड समितीमार्फत जिल्ह्यातील जलसंपदा विभागात शिपाई (4 जागा), चौकीदार (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://www.skipcgroupd.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जलसंपदा विभागाच्या पुणे परिमंडळात विविध पदांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या पुणे प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्यातील पुणे परिमंडळात वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, संदेशक, वीजतंत्री, वाहनचालक, वरिष्ठ लिपिक, लिपिक नि टंकलेखक/सहाय्यक भांडारपाल, लघु टंकलेखक, दप्तर कारकून/कालवा निरीक्षक/मोजणीदार ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://oasis.mkcl.org/wrdpune2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मध्य रेल्वेमध्ये विविध पदांच्या 3840 जागांसाठी भरती

रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेतील ट्रॅकमन (1585 जागा), सफाई कामगार/वॉचमन कम स्वीपर (161 जागा), सफाई कामगार (60 जागा), शिपाई/हमाल (15 जागा), हेल्पर/मदतनीस (624 जागा), हेल्पर मदतनीस (969 जागा), बेअरर/वेटिंगरुम अटेंडंट (15 जागा), लगेज पोर्टर/स्केल पोर्टर/गुडस हमाल (9 जागा), सेल्समन (3 जागा), सह.काटेवाला (383 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 23 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मध्य रेल्वेत खेळाडू कोट्याअंतर्गत एकूण 52 जागा

रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेत खेळाडू कोट्याअंतर्गत एकूण 52 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 23 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जलसंपदा विभागाच्या औरंगाबाद मंडळात 418 जागा

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या औरंगाबाद प्रादेशिक निवड मंडळाद्वारे सरळसेवेतील वरिष्ठ लिपिक (46 जागा), आरेखक (14 जागा), दप्तर कारकून (47 जागा), कालवा निरीक्षक (40 जागा), मोजणीदार (39 जागा), लिपिक टंकलेखक (79 जागा), सहाय्यक आरेखक (13 जागा), अनुरेखक (14 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (74 जागा), वाहनचालक (12 जागा), शिपाई (14 जागा), चौकीदार (9 जागा), लघुलेखक निम्नश्रेणी (6 जागा), लघुटंकलेखक (3 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा), वीजतंत्री (1 जागा), तारतंत्री (1 जागा), कालवा टपाली (4 जागा), प्रयोगशाळा परिचर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीhttp://oasis.mkcl.org/wrdaurangabad2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 5 जागा

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सहायक कुलसचिव (1 जागा), सांख्यिकी अधिकारी (1 जागा), उच्चश्रेणी लघुटंकलेखक (2 जागा), सांख्यिकी सहायक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.muhs.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरक्षकाच्या 385 जागा

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरक्षक (385 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 19 सप्टेंबर 2013 ते 19 नोव्हेंबर 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक पदाच्या 27 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब अंतर्गत शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयातील अधीक्षक (27 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात व इतर माहितीwww.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

युपीएससीच्या भारतीय अर्थ सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेद्वारे 66 जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारतीय अर्थ सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2013 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेव्दारे भारतीय अर्थ सेवातील 30 जागा व सांख्यिकी सेवातील 36 जागा भरण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 17-23 ऑगस्ट 2013च्या अंकात आली आहे. अधिक माहितीwww.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment